तुर्कीस्थान स्फोटातील मृतांची संख्या ९५ वर

तुर्कीस्थान स्फोटातील मृतांची संख्या ९५ वर

तुर्कीस्थानची राजधानी अंकरा येथे कुर्दिश बंडखोरांच्या शांतता फेरी दरम्यान झालेल्या स्फोटात ठार झालेल्यांची संख्या ९५ वर पोहचली आहे. या स्फोटात २४६ जण जखमी झाले आहेत.

कुर्दीश बंडखोर व तुर्की सुरक्षा दलांतील हिंसाचार थांबवण्यासाठी येथील कामगार संघटनांनी शांतता रॅली काढली होती. या रॅलीला टार्गेट करण्यात आले. या हल्ल्याचा तुर्कीस्थान सरकारने निषेध केला आहे.

या हल्ल्यात जखमी झालेल्या ४८ जणांना अतिदक्षता विभागात दाखल केले असल्याची माहिती तुर्कीस्थानचे पंतप्रधान अहमत दावुतोग्लु यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.

तुर्कीस्थान येथे एक नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत. परंतु, कुर्दिश बंडखोरांविरूद्ध सरकारने आक्रमक पवित्रा घेतल्याने सुरूवातीपासूनच निवडणुकीत तणावाचे वातवरण आहे. तर अंकरा येथे शनिवारी झालेल्या या हल्ल्याने निवडणुकीतील तणाव आणखी वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *