कोकण रेल्वेच्या रसायनी स्थानकाजवळ अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. पनवेलच्या रसायनी रेल्वे स्थानकाजवळ एक अपघात घडला आहे. एक अज्ञात व्यक्ती रेल्वे लाईनच्या विद्युत पोलवर चढला आणि त्याला विजेचा करंट लागून मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणेजे त्याचा बचाव करायला गेलेला व्यक्ती देखील यामध्ये जखमी झाला आहे.
बंगाल येथून आलेला एका अज्ञात व्यक्तीचा पगार मालकाने न दिल्याने हा कामगार रेल्वे लाईनच्या विद्युत पोलवर चढला आणि शॉक लागून जागीच त्याचा मृत्यू झाला तर त्याला रेस्क्यू करायला गेलेला एकाला शॉक लागून जखमी झाला आहे.जवळ जवळ दोन तास हे नाट्य सुरू होते. हा कामगार बंगालचा असल्याची माहिती मिळत असून रसायनी पोलिस त्याचे आयडी प्रूफ शोधत आहेत.
रसायनी रेल्वेच्या गेटमनने कोणीतरी व्यक्ती रेल्वेच्या विद्युत पोलवर चढला असल्याची खबर आरपीएफला दिली. आणि आरपीएफ ने रसायनी पोलिसांना दिली. खोपोली हून हेल्प फाउंडेशनच्या मदतनिसांना पाचारण करण्यात आले.प्रथम ही लाईन बंद करण्यात आली अस सांगण्यात आलं आणि मग हे हेल्प फाउंडेशन चा मदतनीस त्याची सुटका करायला गेला.
मात्र सुटका करत असताना या बंगाली कामगाराने वरच्या जिवंत तारेला हात लावल्याने त्याची सुटका करणाऱ्या मदतनीसाला त्याचा शॉक लागला. त्यात तो बंगाली कामगार याचा जागीच मृत्यू झाला तर हेल्प फाउंडेशनचा मदतनीस यालाही शॉक लागल्याने तोही जखमी झाला.त्याला खारघरच्या मेडिकव्हर या हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मृत्युमुखी पडलेला हा कामगार बंगालचा असल्याची माहिती असून तो कोणाकडे कामाला होता आणि त्याचे नाव काय आहे याचा शोध आणि तपास रसायनी पोलिस करत आहेत.
