गाव दिवाळीसाठी रात्री घराबाहेर पडली; सकाळी पडीत घरात 45 वर्षीय महिला… तपासात समोर आला जावयाचा भयानक कट

नंदुरबारमधील एका दुर्गम भागातील गावात घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गाव दिवाळी पाहण्यासाठी गेलेली एक 45 वर्षीय महिला अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर एका पडीत घरात तिचा मृतदेह सापडला. पोलिसांनी घटनेचा तपास करताच एक धक्कादायक कट समोर आला असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकं काय घडलं?

गावात गाव दिवाळी असल्याने 45 वर्षीय महिला रात्री घराबाहेर पडली. मात्र, ती घरी न आल्याने घरच्यांनी तिचा शोध घेत असताना एका पडीत घरात रक्ताच्या थारोळ्यात तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली. मयत महिलेच्या जवळच्या नातेवाईकाने मित्राच्या साथीने महिलेचे डोके सिमेंटच्या पोल वर आदळून व विटेने डोक्यात मारून खून केल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *