मुंबईकरांसाठी वीकेंड ऑफ! महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला सुट्टी जाहीर; शाळांसह ‘या’ कर्मचाऱ्यांना दिलासा

डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि ठाण्यासह अनेक शाळा तसेच सरकारी-निमसरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासनाने मुंबई शहर आणि उपनगरांतील सर्व शासकीय कार्यालयांना शनिवारी सुट्टी घोषित केली असून, सामाजिक न्याय, समानता आणि मानवी हक्कांसाठी डॉ. आंबेडकर यांनी केलेल्या कार्याचा सन्मान करण्याचा हा दिवस असल्याचे सांगितले आहे.

ठाण्यासह मुंबईतही सरकारी कार्यलयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जे कर्मचारी सुट्टीस पात्र नाहीत त्यांना एक दिवसाची अर्जित रजा मंजूर केली जाणार आहे. पालिकेच्या परिपत्रकानुसार अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टीतून वगळण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *