महाराष्ट्र हादरला! मुंबईत कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एका व्यावसायिक महिलेचे कपडे काढले आणि… घटनाक्रम ऐकून पोलिस चक्रावले

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  एका व्यावसायिक महिलेचे कपडे काढून तिचा विनयभंग करण्यात आला. हे सर्व एका  कॉर्पोरेट ऑफिसमध्ये घडले आहे. बंदुकीचा धाक दाखवून महिलेसह गैरवर्तन करण्यात आले. महिलेने तक्रारीत जो घटनाक्म सांगितला तो ऐकन पोलिसही चक्रावले. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महालक्ष्मी परिसरात ही घटना घडली आहे. पीडित महिलेचे महालक्ष्मी  परिसरात कार्यालय आहे. या कार्यालयातच 51 वर्षीय महिलेचा विनयभंग झाला आहे. या महिलेचे कपडे काढून तिला बंदुकीच्या धाकावर धमकावण्यात आले. महिलेने पोलिस तक्रारीत तिच्यावरील अत्याचाराचे वर्णन केले आहे. तिने पोलिसांना सांगितले की17 जानेवारी 2023 रोजी एका कॉर्पोरेट कार्यालयात तिच्यावर हल्ला करण्यात आला. बंदुकीच्या धाकावर तिला कपडे काढून तिला धमकावण्यात आले. आरोपी आणि इतर पाच जणांनी तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली.

मुंबईतील महालक्ष्मी येथील महिलेने मुंबई पोलिसांना या भयानक घटनेची माहिती दिली आहे. पोलिसांनी लैंगिक छळ आणि संबंधित गुन्ह्यांशी संबंधित भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलमांखाली तसेच शस्त्रास्त्र कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिलेने सुरुवातीला पायधोनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, जी नंतर एनएम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली. एनएम जोशी मार्ग पोलिसांनी 2  नोव्हेंबर रोजी एफआयआर नोंदवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला फोटो-फ्रेम आणि गिफ्टिंग व्यवसायात गुंतलेली एक व्यावसायिक महिला आहे आणि महालक्ष्मी येथे राहते. आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि तिचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची आणि फोटो काढण्याची धमकी दिली, जी तिने सोशल मीडियावर व्हायरल करण्याची घोषणा केली. पोलिसांनी जॉय जॉन पास्कल पोस्टेलसह सहा जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *