राज्यात आज नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. राज्यभरात निवडणुकीसाठी उत्साह असून, मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली आहे. उद्या म्हणजेच 2 डिसेंबरला लागणाऱ्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असतानाच, हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. उद्या म्हणजेच 2 डिसेंबरला मतमोजणी होणार नाही असा निर्णय हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. हायकोर्टाच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी जाहीर केली आहे. निकाल, निवडणूक पुढे जात आहेत. ही काही योग्य पद्धत नाही. निवडणूक आयोग, खंडपीठ स्वायत्त आहे त्यामुळे ते मान्य करावं लागेलं. पण यातून भ्रमनिरास होतो. काही चूक नसताना असं होणं योग्य नाही. निवडणूक आयोगाला अजून अनेक निवडणुका घ्यायच्या आहेत अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी जाहीर केली आहे.
नागपूर खंडपीठाने याचिकेवर सुनावणी करताना सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबरला एकत्र होईल असं स्पष्ट केलं आहे. “आज मतदान झालं तरी, सर्व निकाल 21 तारखेला घोषित होईल. पारदर्शकपणे निवडणूक व्हाव्यात यासाठी हे निकाल एकत्र जाहीर केले जाणार आहेत. एक्झिट पोलही 20 तारखेला मतदान झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर जाहीर होईल. आचारसंहिताही 20 डिसेंबरपर्यंत लागू होईल,” अशी माहिती वकिलांनी दिली आहे.
कोर्टाने निवडणूक आयोगावरही नाराजी व्यक्त केली. कोर्टाने निवडणूक आयोगाला पारदर्शक आणि योग्य पद्धतीने झाली पाहिजे असं सांगत ती पुढे ढकलली आहे. निवडणूक निकालावर परिणाम झाला असता हे नाकारता येत नाही असंही ते म्हणाले. कोर्टाने आजचं मतदान होऊ द्यात, मात्र सर्व निकाल एकत्र जाहीर करा असा आदेश दिल्याची माहिती वकिलांनी दिली.
20 डिसेंबरला कुठे निवडणुका होणार आहेत?
पुणे जिल्ह्यातील बारामती, अहिल्यानगरमधील कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी, लातूर जिल्ह्यातील रेणापूर, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, फलटण, सोलापूरमधील मंगळवेढा, यवतमाळ नगरपालिका, वाशिम नगरपालिका, चंद्रपूरमधील घुग्गुस, वर्धामधील देवळी, बुलढाणामधील देऊळगावराजा, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, सोलापूरमधील मंगळवेढा, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात, किती प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या?
जिल्हा व नगरपालिका/पंचायतींचा प्रभाग
पुणे (९ जागा) : दौंड- प्रभाग ९अ (१ जागा), लोणावळा – ५ब, १०अ (२ जागा), तळेगाव : २अ, ७अ, ७ब, ८अ, ८ब, १० (६ जागा) सातारा (३ जागा): कराड प्रभाग १५ब (१ जागा), मलकापूर – ४अ, ८अ (२ जागा)
सांगली (१ जागा) : शिराळा – प्रभाग ४
सोलापूर (३ जागा) : सांगोला : प्रभाग १ अ, ११अ (२ जागा), मोहोळ ३अ (१ जागा) यवतमाळ (६ जागा): दिग्रस प्रभाग २ब, ५ब, १०ब (३ जागा), पांढरकवडा ८ अ, ११ ब (२ जागा), वणी – १४ अ (१ जागा)
वाशिम (२ जागा): रिसोड – ५ब, १०अ
गडचिरोली (४ जागा): गडचिरोली- १ अ,
४ब, ११ ब (३ जागा), आरमोरी प्रभाग १० चंद्रपूर (४ जागा): गडचांदूर – प्रभाग ८ब (१ जागा), मूल- १०ब (१ जागा), बल्लारपूर – ९अ (१जागा), वरोरा ७ब (१ जागा)
गोंदिया (३ जागा): गोंदिया-३ब, ११ब, १६अ
भंडारा (२ जागा): भंडारा १५अ, १२अ नागपूर (९ जागा) : कोंढाळी- प्रभाग ८, १६ (२ जागा), कामठी १०अ, ११३, १७ब (३ जागा), रामटेक ६अ (१ जागा), नरखेड २ब, ५ब, ७अ (3 जागा)
वर्धा (७ जागा) : वर्धा – प्रभाग श्व, १९ब (२जागा), हिंगणघाट ५अ, ५३, ९अ (३ जागा), पुलगाव २अ, ५अ (२ जागा)
बुलढाणा (९ जागा) : खामगाव – प्रभाग ५अ, ७अ, २ब, १६ब (४ जागा), शेगाव -४अ, ४ब (२ जागा), जळगाव जामोद -प्रभाग ६अ, ६ब, ७ब (३ जागा)
जळगाव (१२ जागा) अमळनेर १अ (१
जागा), सावदा २ब, ४ब, १०८ (३ जागा), यावल ८ब (१ जागा), वरणगाव १०अ, १०क (२ जागा), पाचोरा ११अ व १२ब (२ जागा), भुसावळ ४ब, ५ब, ११ब (३ जागा) नाशिक (७ जागा) सिन्नर प्रभाग २अ, ४अ, ५अ, १०ब (४ जागा), ओझर १अ, ८ब (२ जागा), चांदवड प्रभाग ३ (१ जागा)
अहिल्यानगर (१२ जागा) जामखेड प्रभाग २ब, ४ब (२ जागा), श्रीगोंदा – ७ब (१ जागा), राहुरी २अ (१ जागा), संगमनेर -१ब, रब, १५ब (३ जागा), श्रीरामपूर ३अ (१ जागा), शेवगाव- १ब, ५अ, १२अ (३ जागा), शिर्डी : ६अ (१ जागा)
हिंगोली (२ जागा): हिंगोली ५ब, ११ब
परभणी (३ जागा) : जिंतूर – ११क (१ जागा), पूर्णा : १ब, १०ब (२ जागा) नांदेड (३ जागा): भोकर – प्रभाग पब (१ जागा), कुंडलवाडी – ३अ (१ जागा), लोहा ५८ (१ जागा)
बीड (१० जागा) : धारूर प्रभाग १०अ (१ जागा), अंबाजोगाई – पब, ३अ, ६अ, १०ब (४ जागा), परळी ९अ, १४ब, ३अ आणि ब, ११ब (५ जागा)
धाराशिव (३ जागा) : धाराशिव – प्रभाग २अ, ७ब, १४ब (३ जागा)
छत्रपती संभाजीनगर (८ जागा) : वैजापूर -प्रभाग १अ, २ब (२ जागा), गंगापूर ४ब, ६ब (२ जागा), पैठण ३अ, ६ब, ६अ, ११ब (४ जागा)
ठाणे (७ जागा) : बदलापूर प्रभाग ५, ८, १०, १५, १७, १९ (६ जागा), वाडा प्रभाग क्र.१२ (१ जागा)
पालघर (१ जागा): पालघर पूर्व – प्रभाग १ब
