नाशिक जिल्ह्यातून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान करणारं रॅकेट उघड झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर कारमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी मशिनच्या साहाय्याने गर्भलिंग निदान करत असल्याचं समोर आळं आहे.
नाशिकमध्ये हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चाळीसगावचे डॉ. बाबासाहेब पाटील यांच्यावर PCPNDT कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. 17 मार्च रोजी हा सगळा प्रकार नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांच्या वाहन तपासणीच उघडकीस आळा होता. मंगळवारी हा गुन्हा सिद्ध झाला आहे. या प्रकरणात पुढील कारवाई केली जाणार आहे.
चारचाकीत पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र बाळगून गर्भलिंग निदान केल्याचं उघड झालं आहे. इंदिरानगर पोलिसांच्या वाहन तपासणीत 17 मार्च रोजी प्रकार उघडकीस आला होता. सोनोग्राफी यंत्राची विनापरवानगी विक्री केल्याबद्दल GE Healthcare कंपनीही सहआरोपी आहेत. पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र नाशिक पोलिसांकडून जप्त करण्यात आले होते.
महापालिकेच्या चौकशीत कलम 3, 6, 18, 23, 25, 26, 29 अन्वये गुन्हा सिद्ध झाला आहे. दोषी ठरल्यास डॉक्टरला पाच वर्षांपर्यंत शिक्षा व वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आरोपी डॉक्टरांविरोधात पुण्यातही तक्रार दाखल आहे. परवानगीशिवाय यंत्र विक्री व वाहतूक करत गुन्हेगारी केल्यानं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
