गाळा मालक होण्याची सुवर्णसंधी! मुंबईत ‘या’ लोकेशनला स्वस्तात उपलब्ध आहेत दुकानं; सरकारचं करणार लिलाव

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आता घरांसाठी नव्हे तर दुकानांसाठी ई-लिलाव केला जाणार आहे. त्यामुळं ग्राहकांना आता मुंबईत दुकान खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी पुढील 4 दिवसांत जाहिरात काढली जाणार आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील 149 व्यवसायिक गाळ्यांच्या विक्रीसाठी म्हाडाने सप्टेंबर महिन्यात ई लिलाव प्रक्रिया राबवली होती. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी म्हाडाने मुदतवाढ दिल्यानंतरही इच्छुकांना अर्ज करता आला नव्हता. त्यामुळे सदर दुकानांची विक्री होऊ शकली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई मंडळाने पुन्हा 84 दुकानांच्या विक्रीसाठी ई-लिलाव प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

या ठिकाणी असणार दुकाने

सदरची दुकाने कुर्ला-स्वदेशी मिल, तुंगा पवई, कोपरी पवई, चारकोप, जुने मागाठाणे, महावीर नगर कांदिवली, प्रतीक्षा नगर शीव, अँटॉप हिल येथे आहेत. त्यामुळे म्हाडाचे दुकान घेण्यास इच्छुक असणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

पुनर्विकासातून हजार घरे

कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून येथील भाडेकरू रहिवासी आणि इमारतमालकांबरोबरच मुंबईकरांना तब्बल एक हजार घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत. या वसाहतीचा पुनर्विकास म्हाडा बांधकाम आणि विकास संस्थेच्या (सी अँड डीए) माध्यमातून केला जाणार आहे. त्यानुसार भाडेकरू आणि इमारतमालकांना घरे दिल्यानंतर विकसक जेवढे विक्रीयोग्य बांधकाम करेल, त्याच्या तब्बल 8.25 टक्के बांधीव चटई क्षेत्रफळ म्हाडाला मिळणार आहे. त्यामाध्यमातून सुमारे 900 ते 1000 सदनिका उपलब्ध होणार असून, त्याची लॉटरीच्या माध्यमातून मुंबईकरांना विक्री होऊ शकणार आहे.कामाठीपुरा हा सुमारे 34 एकर जागेवर वसला असून, तेथे ९४३ जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *