साहित्यसंपदा संस्थेचा सातवा वर्धापन दिन गणेश मंदिर सभागृह डोंबिवली येथे, लेखक तथा बालसाहित्यिक मा एकनाथ आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक १० नोव्हेंबर २५ रोजी संपन्न झाला. साहित्यसंपदा संस्थेतर्फे दिवाळी अंक स्पर्धा नुकतीच पार पडली व सातव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोकण विभागातून आरोग्य मंत्र दीपावली विशेषांक २०२५ या दर्जेदार अंकाला या वर्षीचा सर्वोत्कृष्ठ दिवाळी अंक हा गौरवशाली पुरस्कार प्रदान करणेत आला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध गझलकार तथा प्रसिद्ध गीत रामायणाचे हिंदी भाषांतरकार मा दत्तप्रसाद जोग, पै फ्रेंडस् लयब्ररीचे संचालक मा पुंडलीक पै, अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवणारे, आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा हेमंत नेहते, हिअरिंग हँडीकॅप मुलांच्या विशेष शिक्षिका मा सुनिता चिंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वोत्कृष्ठ दिवाळी अंक पुरस्कार मा एकनाथ आव्हाड व मा दत्तप्रसाद जोग यांच्या हस्ते संस्थेच्या कार्यालयीन सहाय्यक सौ. अश्विनी चव्हाण यांनी स्विकारला.
साहित्यसंपदाच्या सातव्या वर्धापन दिनी समाज रत्न, पुस्तक रत्न, शिक्षक रत्न, पुरस्कार वितरण सोहळा, काव्य संमेलन, चित्र प्रदर्शन, मिश्किली वाचन, एक प्रवास हिंदी गीत रामायण मा दत्तप्रसाद जोग यांची मुलाखत श्री लालसिंग वैराट, गझल मुशायरा, जगलेल्या कविता, अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल होती. प्रास्ताविक मा सलोनी बोरकर व मा स्मिता हर्डिकर यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष मा वैभव धनावडे यांनी केले. या कार्यक्रमाला कवी लेखक गझलकार, तसेच अनेक साहित्य रसिक उपस्थित होते. साहित्य संपदाचा सातवा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
आरोग्य मंत्र दीपावली विशेषांकाला सर्वोत्कृष्ठ दिवाळी अंक हा बहुमानाचा पुरस्कार लाभल्यामुळे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आरोग्य मंत्र या दीपावली अंकाला ‘ सर्वोत्कृष्ठ दिवाळी अंक ‘ पुरस्कार प्रदान

