पनवेल ते कर्जत प्रवास सुस्साट! नव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात, येत्या वर्षात प्रवाशांसाठी सुरू; कसा असेल मार्ग?

पनवेल आणि कर्जतदरम्यान सुरू असलेला 29.6 किमी लांबीचा रेल्वे कॉरिडोर प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या काही महिन्यात ही मार्गिका पूर्णपणे तयार होणार असल्याची शक्यता आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सीआरएमसीच्या चाचण्या पार पडतील आणि मध्य रेल्वेकडून नवीन टाइम टेबल जाहीर करून प्रवाशांसाठी मार्गिका सुरू केली जाणार आहे. यामुळे आगामी वर्षात प्रवाशांना पनवेल–कर्जत प्रवास अधिक जलद आणि सोपा होणार आहे.

कधी होणार पूर्ण?

पनवेल–कर्जत कॉरिडोर तयार करण्यासाठी सुमारे 2,782 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही चौथी मार्गिका तयार झाल्यावर, पनवेल ते कर्जत प्रवासाचा वेळ अवघ्या 30 मिनिटांवर येणार आहे. प्रकल्प तयार झाल्यानंतर पनवेल, मोहोपे, चिखले चौक आणि कर्जत या पाच स्थानकांवर थेट रेल्वे सेवा मिळणार आहे. ही मार्गिका मार्च 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

थेट सीएसएसटी पर्यंत प्रवास

प्रवाशांना कर्जतहून पनवेलमार्गे हार्बर लाइनचा वापरून मुंबई ते सीएसएमटी पर्यंत सहज पोहोचता येणार आहे, ज्यामुळे कर्जत वासियांच्या प्रवासात अंदाजे https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/articlelist/2429656.cms25 मिनिटांची बचत होणार आहे. जलद लोकलने कर्जत ते सीएसएमटी प्रवासाला अवघे 2 तास लागता, धीमी लोकल ने तर हा प्रवास पूर्ण 3 तासांचा होतो. त्यात रेल्वेच्या नेहमीच्या खोळंब्यामुळे प्रवासाचा वेळ आणखीनच वाढतो. हा प्रकल्प पूर्ण होताच प्रवाशांचा वेळेची खूप बचत होणार आहे.

पनवेल–कर्जत कॉरिडोरमुळे नवी मुंबई, रायगड आणि आसपासच्या भागातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारेल. मुंबई व उपनगरातील वाढत्या प्रवासी ताणाचा विचार करता, या मार्गिकेमुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळेल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पनवेल–कर्जत प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि प्रवाशांचा वेळ वाचविण्यासाठी मोठे पाऊल ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *