पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण, शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयात

शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयात हजर झालीये. वकिलांसह शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयात हजर झालीये.  पुण्यातील जमीन गैरव्यवहारप्रकरणी शीतल तेजवानीची आज पुन्हा चौकशी होत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शीतल तेजवानीचा जबाब नोंदवलाय. मंगळवारी संध्याकाळी ४ नंतर शीतल तेजवानी पोलीस आयुक्तालयात आली होती. त्यानंतर आज पुणे पोलीस आयुक्तालयात हजर झालीय. तिथे तेजवानीचा प्राथमिक जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आलीय.आज तिला पुन्हा संबंधित कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. दरम्यान शीतल तेजवानीला अटक का केली नाही असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विचारलाय.

देशभर गाजत असलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कोट्यवधी रुपयांचा घोटाळा दिवसाढवळ्या केलेल्या आरोपीला पोलीस आणि महसूल प्रशासन मात्र सोईसवलती देत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. शीतल तेजवानी ही कोरेगाव पार्क परिसरातल्या 300 कोटींच्या जमीन व्यवहारातील आरोपी आहे. अशा शीतल तेजवानीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तिच्यावर कारवाई करण्यात तत्परता दाखवताना दिसत नाहीयेत. थंडा करके खाओ अशा भूमिकेत पोलीस चालल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय. वास्तविक पाहता प्रकरणात आरोपी पुरावे नष्ट करण्याची शक्यता असते. त्यामुळं शीतलची तातडीनं ताब्यात घेऊन चौकशी करणं गरजेचं होतं.

शीतल तेजवानीवर 6 नोव्हेंबरला गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर 9 दिवस पोलीस शांत राहिले. तब्बल 9 दिवसानंतर पोलिसांनी 14 नोव्हेंबरला नोटीस बजावली. 14 नोव्हेंबरला चौकशीसाठी नोटीस बजावली. नोटीस बजावल्यानंतर 5 दिवसांनी शीतल चौकशीसाठी हजर झाली. शीतलनं तोपर्यंत हायकोर्टात गुन्हा रद्द करण्याची याचिका केली. कोर्टातून शीतलला दिलासा मिळाला नाही.

शीतलची आणखी चौकशी होणार
आता शीतलनं एवढी धडपड केल्यावर पुणे पोलिसांना जाग आली. पुणे पोलिसांसमोर ती 18 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर झाली. ही चौकशी एवढ्या गुप्तपणे उरकली की माध्यमांना त्याची खबरही लागली नाही. शीतलची आणखी चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी तिला गुरुवारी बोलवण्यात आलंय.

पोलिसांच्याच सूत्रांच्या माहितीनुसार आता शीतल उद्याही पोलिसांसमोर हजर राहण्याच्या मानसिकतेत नाही. तिनं पोलिसांकडं उद्याचा दिवस थांबा असं सांगत आणखी मुदत वाढवून घेतल्याची माहिती आहे. अर्थात याला कोणीही अधिकृत दुजोरा देणार नाही.

शीतल तेजवानीला अटक का नाही? 

एक आरोपी पोलिसांच्या समोर पुण्यात मोकाट फिरतो. गुन्हा रद्द करण्यासाठी कोर्टात जातो तरीही त्याच्यावर पोलीस कारवाई का करत नाही. पोलीस अटक का करत नाही असा सवाल अंजली दमानियांनी केलाय. तर पोलीस अजून बघू करु या भूमिकेतून बाहेर यायला तयार नाहीयेत.

हे झालं पोलिसांचं. महसूल विभागही शीतल तेजवानीच्या थोडं जास्तच प्रेमात असल्याचा आरोप होतोय. शीतल तेजवानी हिनं केलेला व्यवहार रद्द करण्यासाठी तिला 21 कोटींची स्टँप ड्युटी मागण्यात आली. ही स्टँप ड्युटी भरायची गरज नसल्याचं सांगायला महसूलमंत्री बावनकुळेंनी मागंपुढं पाहिलं नाही.

शेवटी नियम माहिती झाल्यानंतर तोंडघशी पडलेल्या महसूल विभागानं शीतलप्रेम कमी केलं नाही. शीतलच्या वकिलांनी स्टँप ड्युटी भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत मागितली. आता शीतल तेजवानी मुदत मागते म्हटल्यावर लगेच मुद्रांक शुल्क विभागानं एक आठवड्याची मुदत देऊन टाकली. जी महिला सरकारची जमीन विकण्याचा प्रयत्न करते. सरकारची स्टँप ड्युटी चुकवते. त्या महिलेवर एवढी मेहेरबानी कशासाठी असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *