गाणं आटपा, ‘घाणेकर’च्या विंगेतून गायिका प्रियंका बर्वेंना सूचना? व्यावसायिक नाटकाचे निर्माते म्हणतात…

ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात रविवारी दुपार आणि रात्रीच्या कार्यक्रमांचे आयोजक आणि व्यवस्थापनामध्ये वाद झाला. यासंदर्भात स्वयम् पुनर्वसन संस्थेने आयुक्तांकडे तक्रार केली आहे. सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांच्या गाण्याचा कार्यक्रम रविवारी दुपारी आयोजित करण्यात आला होता. तर त्यानंतर रात्री आयोजित व्यावसायिक नाटकाच्या प्रयोगासाठी ६.४५ वाजल्यापासूनच गायकांना गाणे आटोपते घेण्याच्या सूचना विंगेतून देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

बहुविकलांग मुलांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या स्वयम् संस्थेने निधी संकलनासाठी सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे आणि सौरभ दप्तरदार यांच्या गीतांचा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत आयोजित केला होता. त्यानंतर रात्री ८ वाजता एका व्यावसायिक नाटकाचा प्रयोग होता. त्यासाठी गायकांना ६.४५ वाजल्यापासूनच कार्यक्रम थांबवण्याच्या सूचना विंगेतून देण्यात आल्याचा दावा स्वयम् संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त नीता देवळालकर यांनी केला.

कलावंतांचा अपमान, रसिकांचाही हिरमोड

त्यांनी याबाबत आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार केली. प्रतिथयश कलावंतांचा अपमान झाला, रसिकांचाही हिरमोड झाला. घाईत कलाकारांवर दबाव आणून कार्यक्रम बंद पाडणे व्यथित करणारे आहे, आयुक्तांनी संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी, असे देवळालकर यांनी पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *