स्मार्टकार्ड नाही… नो टेन्शन, पैसे टाकूनही घेता येणार रेल्वे तिकीट!

स्मार्टकार्ड नाही… नो टेन्शन, पैसे टाकूनही घेता येणार रेल्वे तिकीट!

लोकल तिकीटासाठी अनेकदा लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. त्यासाठी रेल्वेकडून स्मार्टकार्ड योजनाही अंमलात आणण्यात आली. याचा अनेक प्रवाशांना मोठा फायदाही झाला. मात्र, आता या स्मार्टकार्ड व्हेडिंग मशीनमध्ये आणखी अमूलाग्र बदल करण्यात आले आहेत.

काल या नव्या व्हेडिंग मशीनचं उद्घाटन करण्यात आलं. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील काही स्थानकांमध्ये हे नवं मशीन बसविण्यात आलं आहे.

उपनगरीय रेल्वे तिकीटासाठी आता स्मार्टकार्डप्रमाणे पैसे टाकूनही तिकीट घेता येणार आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांना स्मार्टकार्डवर अवलंबून रहावं लागणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *