मुंबईतील ‘या’ विभागात तब्बल 22 तास पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. दोन दिवसांत मुंबईकरांना पाणीबाणी सहन करावी लागणार आहे. शु्क्रवार 14 नोव्हेंबर ते शनिवारी 15 नोव्हेंबरपर्यंत शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळं मुंबईकरांना जपून पाणी वापरण्याचे अवाहन करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जलवाहिन्यांवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे एन, एल, एम पश्चिम व एफ उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. शुक्रवार, दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून शनिवार, दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळं नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असं अवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेची 1200 मिलिमीटर व्यासाची जुनी तानसा, 1200 मिलिमीटर व्यासाची नवीन तानसा आणि 800 मिलिमीटर व्यासाच्या विहार ट्रंक मुख्य जलवाहिनीवरील 300 मिलिमीटर, 600 मिलिमीटर व 900 मिलिमीटर व्यासाच्या एकूण पाच झडपा बदण्याचे काम हाती घेण्यात येत आहे.

हे काम शुक्रवार, दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून शनिवार, दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत (एकूण 22 तास) सुरू राहणार आहे. त्यामुळे या २२ तासांच्या कालावधीत महानगरपालिकेच्या एन, एल, एम पश्चिम आणि एफ उत्तर विभागातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

विद्याविहार, ताडवाडी, भक्ती पार्क,टिळक नगर परिसरात पाणीबाणी असणार आहे. घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, वडाळा, सायन आणि माटुंगा येथे 22 तास पाणीपुरवठा बंद असणार आहे.

एन विभागः राजावाडी पूर्वेकडील संपूर्ण परिसर, चित्तरंजन नगर, विद्याविहार परिसर, राजावाडी रुग्णालय, ओ.एन.जी.सी वसाहत, रेल्वे कर्मचारी वसाहत, आर.एन.गांधी मार्ग.

एल विभागः न्यू टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर, नेहरू नगर, मदर डेअरी रस्ता, शिवसृष्टी रस्ता, नाईक नगर, जागृती नगर, केदारनाथ मंदिर मार्ग, एस.जी बर्वे मार्ग कुर्ला पूर्व, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलीस वसाहत, कसाई वाडा, चुनाभट्टी, राहुल नगर, एवराई नगर, कुरेशी नगर, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, पान बाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही एन पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग तसंच एम पश्चिम विभाग व एफ उत्तर विभाग- शीव (सायन) परिसरातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

वडाळा, सायन, माटुंगा, दादर.. (15 नोव्हेंबर रोजी पहाटे 3.45 ते सकाळी 8 वाजेपर्यंत)

सायन (पूर्व आणि पश्चिम), दादर पूर्व, माटुंगा पूर्व, वडाळा, चुनाभट्टीचा काही भाग, प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, आल्मेडा कंपाऊंड, पंचशील नगर, वडाळा ट्रक टर्मिनल, सोडा बिल्डिंग्ज (न्यू कफ परेड), सायन कोळीवाडा-सरदार नगर, संजय नगर, गांधी नगर, गांधी नगरचा काही भाग. गायकवाड नगर, कोरबा मिठागर, वडाळा, आणि भीमवाडीचे प्रवेशद्वार क्र. 4 आणि 5.

चेंबूर… (14 आणि 15 नोव्हेंबर)

टिळक नगर, टिळक नगर स्टेशन रोड, पेस्तोम सागर रोड क्र. 1 ते 6, ठक्कर बाप्पा कॉलनी (सेक्टर 1 ते 4), शास्त्री नगर, वत्सलाताई नाईक नगर, सहकार नगर, शेल कॉलनी, इंदिरा नगर, एस.जी. बर्वे मार्ग, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे वर, भगवान कॉलनी (ईस्टर्न एक्स्प्रेस रोड) मार्गावर यशवंत नगर, सम्राट अशोक नगर, राजा मिलिंद नगर, आदर्श नगर, भक्ती पार्क, अजमेरा कॉलनी, एमएमआरडीए एसआरए कॉलनी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *