‘मुलगा पुण्यात 300 कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही, हे पटतंय का?,’ अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी

पार्थ पवारांचं जमीन गैरव्यवहार प्रकरण उजेडात आणल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरण आता पोलिसांपर्यंत गेलं असून, बावधन पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच मुद्रांक विभागाल सात दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे विरोधकांनी अजित पवारांना लक्ष्य केलं असून त्यांनी नैतिकतेच्या आधारे पदापासून दूर व्हावं अशी मागणी होत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनीही हीच मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *