इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करावं, अशी मागणी सातत्याने अनेकांकडून करण्यात येत होती. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा मुद्दा लावून धरला होता. अखेर केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेला प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाने मान्य केला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी इस्लामपूरचं नाव बदलण्यात आलं आहे. याबाबत आजच अध्यादेश निघाला आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया देताना याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
