मुंबईतील पवईतील आरए स्टुडिओमध्ये एका तरुणाने 15 ते 20 मुलांना ओलीस ठेवलं. स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर अभिनयाचे वर्ग आणि ऑडिशन्स सुरू असताना ही घटना घडली. खिडक्यांमधून मुलांना बाहेर डोकावताना पाहून जवळच्या लोकांमध्ये खळबळ उडाल्याच पाहिला मिळालं. या घटनेनंतर मुंबईत एकच खळबळ माजली आहे. मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपी रोहीत आर्यला अटक करण्यात आली होती. दरम्यान रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.
पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?
पवई पोलिसांना पावणे नऊ वाजता फोन आला. पवईत महावीर क्लासेस येथे मुलांना एकाने डांबून ठेवलंय, असं संबंधिताने सांगितलं. आम्ही त्याच्याशी चर्चा केली. मुंबई पोलीसांनी फोर्सचा वापर करुन 17 मुलं आणि 1 सिनिअर आणि 1 नागरिकाला सुरक्षित आणलं. पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात आरोपी जखमी झालाय, अशी माहिती डीसीपी दत्ता नलावडेंनी दिली. त्याच नाव रोहित आर्य असे आहे. त्याच्याकडे एअर गन आणि केमिकल्स दिसले. आरोपी एकटाच होता. आणखी त्याच्याकडे काय हत्यार होतं का? हे तपासाअंती समोर आल्याचे नलावडे म्हणाले. आम्ही त्याच्याशी बातचित सुरु केली. तो आपल्या मागण्यांवर ठाम होता. यानंतर पवई पोलिसांनी बाथरुममधून फोर्स एन्ट्री केल्याची माहिती डीसीपी दत्ता नलावडेंनी माहिती. आरोपीचा इतिहास शोधला जाईल. याच्या नक्की मागण्या काय होत्या याबाबत तपास केला जातोय. वेबसिरीजच्या ऑडीशनसाठी त्याने मुलांना बोलावलं होतं. हे ऑपरेशन मुंबई पोलिसांसाठी खूप चॅलेंजिंग होते. आत लहान मुलं होती. त्यांना वाचवणं हे मोठं आव्हान होतं. आमच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करत सर्वांना सुरक्षित बाहेर काढलं.
