स्विमिंग पूलमध्ये बुडून एका साडेतीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंबईजवळच्या विरार परिसरात घडली आहे. ध्रुव बिष्ट असे मृत मुलाचे नाव आहे. साडेतीन वर्षांचा ध्रुव स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना बुडून मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे बिष्ट कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, विरार येथील यशवंत नगर परिसरात अमेय क्लासिक क्लब आहे. या क्लब मध्ये स्विमिंग पूल असून नागरिक पोहण्यासाठी स्विमिंग पूल मध्ये येत असतात. साडेतीन वर्षाचा ध्रुव बिष्ट हा मुलगा त्याच्या आईसोबत क्लबमधील स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी आला होता.
