अंबरनाथमध्ये एका विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली ऑर्थोपेडिक सर्जनला अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा डॉक्टर या पेशातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
भावनिक मनस्थितीचा गैरवापर
या आमिषाखाली आरोपीने वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. विधवा महिलेच्या दु:खद परिस्थितीचा फायदा घेत, तिच्या भावनिक अवस्थेचा गैरवापर करून आरोपीने तिला फसवलं. बराच काळ संबंध ठेवल्यानंतर, लग्नाच्या आश्वासनात काहीच तथ्य नसल्याचं महिलेला समजलं आणि तिने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. असून तिचा पती काही महिन्यांपूर्वी निधन पावला होता. मृत पती हा या आरोपी डॉक्टरचा पेशंट होता. पतीच्या निधनानंतर डॉक्टरने महिलेला मानसिक आधार देण्याच्या बहाण्याने जवळीक साधली आणि नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवले.
महिलेच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलिसांनी या डॉक्टरला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर स्थानिक परिसरात संतापाची लाट उसळली आहे. समाजातील एक सन्माननीय समजल्या जाणाऱ्या व्यावसायिकाकडून अशा अमानुष कृत्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
