मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर रविवारी, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ‘मेगाब्लॉक’…

मुंबईकरांनो, रविवारी मध्य रेल्वेवर तर शनिवारी रात्री पश्चिम रेल्वेवर मोठा ‘मेगाब्लॉक’ होणार आहे. या ब्लॉकदरम्यान काही मार्गांवरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार असून, काही गाड्यांचे वेळापत्रक बदलले जाईल. प्रवाशांना पर्यायी नियोजन करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेवरील ब्लॉक माहिती 

कुठे: माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

वेळ: सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 पर्यंत

परिणाम:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल्सना माटुंगापासून मुलुंडपर्यंत धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. या लोकल्स माटुंगा ते मुलुंडदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याकडे जाणाऱ्या जलद लोकल्सना मुलुंड येथे पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येईल.

ठाणेहून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 या वेळेत सुटणाऱ्या अप जलद लोकल्सना मुलुंडपासून माटुंगादरम्यान धीम्या मार्गावर नेण्यात येईल आणि माटुंगा येथे पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येईल.

ट्रान्स हार्बर मार्ग 

कुठे: ठाणे – वाशी/नेरुळ दरम्यान

वेळ: सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत

परिणाम:

ब्लॉक दरम्यान ठाणे ते वाशी, नेरुळ आणि पनवेल दरम्यानच्या सर्व लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक माहिती

कुठे: वसई रोड – भाईंदर दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

वेळ: शनिवारी रात्री 1.15 ते पहाटे 4.45 पर्यंत

परिणाम:

ब्लॉक कालावधीत विरार – भाईंदर आणि बोरिवली दरम्यान धावणाऱ्या जलद लोकल्सना धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. काही लोकल गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात येतील. मात्र, पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही मेगाब्लॉक नसेल. रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना आवाहन केलं आहे की, या ब्लॉकच्या वेळेत प्रवासाचे नियोजन करताना काळजी घ्यावी आणि पर्यायी सेवा किंवा वेळ निवडावी, जेणेकरून गैरसोय टाळता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *