मुंबईकरांसाठी खुशखबर. मध्य रेल्वेवर आजपासून कागदविरहीत तिकिट मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे मुंबईकर प्रवाशांना तिकिटासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या सेवेचा शुभारंभ केला. या सेवेला आधीच दिल्लीत हिरवा कंदील दाखविण्यात आला होता.
मोबाईलधारक हे टिकिट आपल्या अॅड्रॉईड मोबाईलवर युटीएस ऑन मोबाईल हे अॅप डाऊनलोड करुन काढू शकतात. या अॅपमध्ये तुम्ही मुंबई शहर निवडून आर वॉलेट या सुविधेद्वारे पैसे भरु शकता. तसेच ही सुविधा एक्स्प्रेस गाड्यांसाठीही उपलब्ध असून तुम्ही आरक्षण करु शकता आणि तिकीट काढू शकता.
रेल्वेने इस्त्रोच्या मदतीने या तिकिटांसाठी सीमारेषा आखून घेतली आहे. यामुळे तुम्हाला ज्या स्थानकापासून टिकिट काढायचे आहे, त्या स्थानकापासून तुम्ही २ किलोमीटरच्या आत असणे आवश्यक आहे.

