चिमुरड्यांच्या मृत्यूनंतर WHO अॅक्शन मोडवर, कोल्ड्रिफसह ‘या’ तीन कफ सिरपबाबत दिला धोक्याचा इशारा

मध्य प्रदेश आणि राजस्थानसह अनेक भागत कफ सिरपमुळं चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. WHOने सर्व देशांना अपील केली आहे की, त्या देशात जर सिरप सापडले तर लगेचच याची माहिती कळवावी. यात कोल्ड्रिफ सिरपचेही नाव आहे.

काय आहे प्रकरण?

तामिळनाडुची कंपनी sresan Pharmaceuticals चे लायसन्स पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. कारण सरकारने केलेल्या चाचणीत Coldrif सिरपमध्ये डाइएथिलीन ग्लायकोल (DEG) नावाचे विषारी घटक आढळले होते. हे तेच विषारी घटक आहे ज्यामुळं याआधीही मृत्यू झाले होते. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात पारसिया गावात कमीत कमी 22 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूचे कारणदेखील हाच विषारी घटक असल्याचे बोलले जात आहे.

 

WHO चा इशारा, ही तीन कफ सिरप खतरनाक

जागतिक आरोग्य संघटनाने भारतातील तीन कफ सिरपच्या विशेष बॅचबाबत इशारा जारी केला आहे. WHOनुसार या औषधांचे सेवन केल्यास मुलांमध्ये गंभीर आजार किंवा मृत्यू होऊ शकते.

>> Coldrif
निर्माता: Sresan Pharmaceuticals (Tamil Nadu)

>> Respifresh TR
निर्माता: Rednex Pharmaceuticals

>> ReLife
निर्माता: Shape Pharma

WHO ने म्हटले की, हे सिरप आरोग्यासाठी खूप गंभीर धोका निर्माण करतात आणि जीवघेणे आजार निर्माण करू शकतात. मुलांचे मृत्यू आणि कोल्ड्रिफ सिरपवरील कारवाईनंतर, WHO ने भारताला विचारले की हे सिरप इतर देशांमध्ये निर्यात केले जातात का? भारताच्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने WHO ला दिलेल्या माहितीनुसार, या सिरपमध्ये परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा 500 पट जास्त डायथिलीन ग्लायकोल होते आणि मध्य प्रदेशात मृत्युमुखी पडलेल्या मुलांनी (सर्व 5 वर्षाखालील) घेतलेले सिरप हेच होते.भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की हे सिरप भारताबाहेर निर्यात केले जात नव्हते.

कंपनीच्या मालकाला अटक

कोल्ड्रिफ सिरपमध्ये 48 टक्क्याहून अधिक DEG आढळले. मात्र खर तर याची मर्यादा फक्त 0.1 टक्के इतकीच असायला हवी. कंपनीचे मालक रंगनाथन यांनादेखील अटक करण्यात आले असून तामिळनाडूच्या अन्य औषध कंपन्यांना तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सल्ला दिला आहे की, लहान मुलांना हे कफ सिरप देऊ नका. खासकरुन 2 वर्षांपेक्षा लहान मुलांना अजिबात हे सिरप देऊ नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *