शंभु तावरे या सर्प मित्राने एका सापाला पकडलं…तेही नागरी वस्तीतून नाही… साप पकडतांना त्याने भलतीच मस्करी केली. महत्वाचं म्हणजे हा प्रकार पोलिसांच्या समोर सुरू होता. त्यानंतर या सर्पमित्रानं धावत्या बाईकवर या नागाला स्वत:च्या गळ्यात टाकलं. खेळ दाखवण्याचा हा प्रकार थोड्याच वेळात त्याच्या अंगलट आला.
या सापानं त्याचा चावा घेतला. बाईकवरुन हे दोघेही खाली पडले. या सर्पमित्राला अखेर रुग्णालयात उपचार घ्यावे लागले..साप विषारी होता…मात्र वेळेत उपचार झाल्याने शंभुचा जीव वाचला. अशा सर्पमित्रावर कारवाई करण्याची मागणी प्राणीमित्रांकडून करण्यात येत आहे.
