सोमनाथ मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी

सोमनाथ मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी

गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने दिली आहे.

मंदिर ट्रस्टच्या नावे पत्र लिहून ही धमकी देण्यात आली आहे. बडोदा येथून हे पत्र पाठवण्यात आले असून ते चक्क गुजराती भाषेत लिहिण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी पत्राची माहिती मिळताच ट्रस्टने याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

मंदिर परिसरात बॉम्बनाशक पथकाला पाचारण करण्यात आले असून शोधमोहिम सुरू आहे. मात्र, तपासणीत कुठल्याही प्रकारची संशयीत वस्तू आढळली नसल्याचे सांगण्यात येते.

१२ ज्योर्तिंलिगांपैकी श्री सोमनाथ हे पहिले ज्योतिर्लिंग गुजरात मधील सौराष्ट्र या ठिकाणी आहे. दररोज देशभरातून हजारो भाविक या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात.

यापूर्वी २९ सप्टेंबर रोजी मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल उडवण्याचीही धमकी देण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *