आयुष कोमकर हत्या प्रकरणात वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुण्यात टोळी युद्धातून झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात आता पुणे पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत माजी नगरसेवकवनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकरला ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहतीनुसार, सोनाली आंदेकर हिच्यासोबत कृष्णा आंदेकर याच्या पत्नीला सुद्धा गुन्हे शाखेने घेतले ताब्यात घेतलं आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या संपूर्ण आंदेकर कुटुंब पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. यापूर्वी कृष्णा आंदेकरने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं. तर, बंडूअण्णा आंदेकरलाही अटक करण्यात आली आहे.

आयुष कोमकर हत्या प्रकरणात संपूर्ण आंदेकर कुटुंब आता पोलिसांच्या ताब्यात आहे. वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकर ही पुणे पोलिसांच्या रडारवर होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सोनाली आंदेकरला ताब्यात घेतलं आहे. पुढील कारवाई सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *