क्कन जिमखाना मेट्रो स्टेशनजवळील नदीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम महामेट्रोकडून सुरू करण्यात येणार आहे. परिणामी आज, बुधवारपासून भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन महामेट्रोकडून करण्यात आलं आहे.
डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला पेठ भागाशी जोडणाऱ्या पादचारी पुलाचे सुरू असणारे काम गणेशोत्सवादरम्यान बंद केले होते आणि भिडे पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. आता पादचारी पुलाचे काम पुन्हा 10 सप्टेंबरपासून सुरू केलं जाणार आहे. त्यासाठी भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. नदी पात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला असेल.