नेपाळ ची राजधानी काठमांडू येथे रक्तरंजित असं आंदोलन बघायला मिळत आहे. नेपाळ सरकारने काठमांडूमध्ये सोशल मीडियावर बंदी आणली आहे. या विरोधात नेपाळचे लाखो तरुण रस्त्यावर उतरली आहेत. या तरुणांनी नेपाळ सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने दिली. आंदोलक तरुणांनी नेपाळच्या संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना आंदोलक तरुणांवर गोळीबार करावा लागला. आंदोलक इतक्या मोठ्या संख्येत आहेत की पोलिसांना आवरणं कठीण होऊन बसलं आहे. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार करावा लागला. पोलिसांनी संसदेत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच या आंदोलना विरोधात करण्यात येत असलेल्या कारवाईत आतापर्यंत 80 पेक्षा जास्त तरुण जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे.
नेपाळ सरकारने काठमांडूमध्ये 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली आहे. त्यामुळे तरुणांचा जनक्षोभ उसळला आहे. नेपाळमध्ये लाखो तरुण रस्त्यावर आल्याने सरकारवर मोठं संकट कोसळलं आहे. नेपाळ सरकारने तातडीची आपात्कालीन बैठक बोलावली आहे. यासोबतच रात्री 10 वाजेपर्यंत काठमांडूत कर्फ्युची घोषणा केली आह
नेपाळमध्ये तरुणांनी सुरु केलेल्या या आंदोलनाला ‘जेन-झी रिव्हॉल्यूशन’ असं नाव देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे आंदोलन नेपाळच्या इतर शहरांमध्ये देखील पोहोचलं आहे. पोखरा, डांग अशा शहरांमध्ये देखील निदर्शने केली जात आहेत. काठमांडूचे महापौर बालेन शाह आणि राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाच्या नेत्यांनी तरुणांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आंदोलनाचा आवाका पाहता सरकारने काठमांडूमध्ये इंटरनेट आणि फोन सेवा खंडीत केली आहे.