मेट्रो 4चा पहिला टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत; ठाणेकरांना थेट मुंबई गाठता येणार, अशी असतील स्थानके!

वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या मार्गावर सहा डब्यांची गाडी ट्रॅकवर उतरवण्यात आली आहेआता लवकरच एमएमआरडीएकडून या मार्गावर चाचण्या घेण्यात येणार आहेतपुढील 15 दिवसांत या चाचण्यांना सुरुवात केली जाणार असून यामुळं मेट्रो 4चा पहिला टप्पा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहेत्यामुळं ठाणेकरांना लवकरच मेट्रोची भेट मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसारएमएमआरडीएकडून गायमुख ते कॅडबरी जंक्शन या मेट्रो मार्गावर या ट्रायल रन घेतल्या जाणार आहेतत्यामध्ये गाडीच्या चाचण्यावजनासह गाडीच्या चाचण्यासिग्नलिंग यंत्रणा आणि ट्रॅक्शनच्या चाचण्यांचा समावेश असणार आहेतसंचचाचण्या पूर्ण झाल्यावर आरडीएसओकडून मेट्रो गाड्यांची चाचणी होईलतसंच पालिकेकडून परवानग्या मिळाल्यानंतर कमिशन ऑफ मेट्रो रेल सेफ्टी यांना तपासणीसाठी बोलवले जाणार आहे.

दरम्यानअद्याप मेट्रोचे कारशेड तयार झालेले नसल्यामुळं ही मेट्रो मार्गिकेच्या उन्नत मार्गावरच गाड्या उभ्या करण्याची सुविधा एमएमआरडीएने केली आहेत्यांच्यावरुनच या गाड्या चालवल्या जाणार आहेतमेट्रो 4 आणि 4 अ प्रकल्पाचे काम 85 टक्के पूर्ण झाले आहे.

मेट्रो 4 ही 32.32 किमी तर मेट्रो 4 अ ही 2.7 किमी लांबीची मार्गिका आहेया दोन्ही मार्गिकांवर मिळून 32 स्थानके असतीलयातील पहिल्या टप्प्यात या दोन्ही मेट्रो मार्गिकांवर मिळून गायमुख ते कॅडबरी जंक्शन या 10.5 किमीच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहेपहिल्या टप्प्यात सुरू होणाऱ्या मेट्रो मार्गावर 10 स्थानके असतीलया 10 स्थानकांची कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत.

अशी असतील स्थानके

मेट्रो 4 आणि 4 अ मार्गावर कॅडबरी जंक्शनमाजीवाडाकापूरबावडीमानपाडाटिकुजीनीवाडीडोंगरी पाडाविजय गार्डनकासारवडवलीगोवनीपाडा आणि गायमुख अशी स्थानके असणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *