नोंदणी केल्यानुसार गणेश मूर्ती वेळेत तयार करता न आल्यामुळे गणपती मूर्तिकार कारखाना बंद करुन पळून गेला.
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर गणेश भक्तांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे
डोंबिवली पश्चिम येथील महात्मा फुले रोडवर असलेल्या आनंदी कलाकेंद्र नावाच्या कारखान्याचा मूर्तिकार भक्तांना संकटात टाकून गेला
बुधवारी पहाटेपासून ऑर्डरच्या मूर्ती मिळविण्यासाठी भक्तांनी कारखान्यात तोबा गर्दी केली. पर्यायच न उरल्याने अक्षरशः मिळेल ती मूर्ती उचलून काही जण घेऊन जात आहेत.
सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती मूर्ती आहेत त्या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी उचलून नेल्या, आणि कारखान्यातील कलरही सोबत नेले
सकाळी सात वाजता पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारखाना बंद केला अन् पळून गेलेल्या मूर्तिकाराचा शोध सुरु केला
शेकडो डोंबिवलीकरांनी दोन-तीन महिन्यांपूर्वी मूर्ती बुक केली होती. मात्र आता मूर्तिकाराचा फोन बंद लागतोय, तर कारखानाही नसल्याने मूर्ती घेण्यासाठी आलेल्या भक्तांची निराशा झाली आहे
गणपती बाप्पाला घरी आणायचे कसे, या चिंतेत शेकडो गणेश भक्त पडले आहेत. दोन-तीन महिन्यांपासून केलेल्या बुकिंगचे पैसे तर वाया गेलेच, शिवाय ऐनवेळी मूर्तीही हाती नाही, म्हणून गणेश भक्तांनी संताप व्यक्त केला