‘माझ्या पोराला शिकलेली बायको करायचीय’; सूनेचा 2 वर्षांपासून छळ, चारित्र्यावरही संशय, शेवटी तिने…

समाजात अजूनही सूनांवर अत्याचाराच्या घटना घडत आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी सासरमध्ये सूनेचा छळ होत असल्याच्या बातम्या समोर येतात. आपला संसार मोडायला नको म्हणून मुली सर्व सहन करतात, संयमी राहतात मात्र बुरसटलेल्या बुद्धीच्या लोकांना याचा काही फरक पडत नाही. अशाच प्रकारची घटन समोर आली आहे. नंदुरबारमधील धडगाव तालुक्यामधील हे प्रकरण आहे.

विवाहिता अशिक्षित आहे. माझ्या मुलाला शिकलेली बायको करायची आहे. या कारणासाठी दोन वर्षांपासून विवाहितेचा सासरच्यांकडून मानसिक छळ करून मारहाण करण्यात येत होती. अखेर तिच्या फिर्यादीवरून पती सह चौघांविरुद्ध जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धडगाव तालुक्यातील मुंदलवड महाराजपाडा येथे राहणाऱ्या 25 वर्षीय महिलेचे धुळे तालुक्यातील फागणे येथील अधिकार श्रीराम पाटील याच्याशी लग्न झाले होते. पीडित विवाहिता ही अशिक्षित आहे. त्यामुळे अधिकार पाटील याला शिकलेली बायको करायची आहे. असे सांगून 2023 ते 2025 या दोन वर्षाच्या कालावधीत वारंवार विवाहितेचा मानसिक छळ केला. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार हाता बुक्यानी मारहाण करीत शिवीगाळ करून जीवे ठार करण्याची धमकी दिली.

विवाहितेने अखेर धडगाव पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिल्याने पती अधिकार श्रीराम पाटील यांच्यासह श्रीराम झिंगा पाटील, प्रमिला श्रीराम पाटील, वंदू बाई श्रीराम पाटील सर्व रा. फागणे ता. धुळे यांच्याविरुद्ध भा. द.वी कलम 498(अ), 323, 504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकारे पुढील तपास पो. ह. संजय माळी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *