अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील अंजनापुर येथील ग्रामसेवक बाजीराव रखमाजी बाचकर यांनी शुक्रवार 8 ऑगस्ट रोजी नेवासा तालुक्यातील करजगाव येथे आपल्या राहत्या घरी विष घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर बाचकर यांच्या कुटुंबीयांकडून कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या दोघा अधिकाऱ्यांनी मानसिक आणि आर्थिक छळ केल्यामुळे बाचकरांनी टोकाचा निर्णय घेत जीवन संपवल्याचा आरोप कुटुंहीयांनी केला आहे.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन देऊन संबंधित गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. बाचकर कुटुंबाच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे.
