दीपक कुमार नावाच्या एका 20 वर्षीय तरुणाच्या आईच्या बँक खात्यात अचानक 1 अब्ज 13 लाख 56 हजार कोटी रुपये जमा झाल्याचा प्रकार उत्तर प्रदेशात घडला. दीपकच्या मोबाईलवर खात्यात ३६ अंकांची मोठी रक्कम जमा झाल्याचा मेसेज आला. हा मेसेज पाहून तो चक्रावला. असाच प्रकार मे महिन्यात उत्तर प्रदेशातील आणखी एका व्यक्तीसह घडला होता. या व्यक्तीच्या बँक खात्यात तब्बल 1001356000001395421002356000039542 रुपये जमा झाले होते. फक्त 60 सेकंदात हा व्यक्ती अंबानीपेक्षा श्रीमंत झाला.
अजित कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. अजित कुमार हे शतेकरी आहेत. मे महिन्यात त्यांच्या बँक खात्यात अचानक 1001356000001395421002356000039542 रुपये जमा झाले. एक दिवस आधी त्यांच्या खात्यातून 1800 रुपयांची फसवणूक झाली होती. दुसऱ्याच दिवशी अचानक खात्यात इतके पैसे दिसू लागले. फसवणुकीचा बळी पडल्याची भीती बाळगून त्यांनी ताबडतोब कोतवाली सादाबाद येथे तक्रार दाखल केली. त्यांनी सायबर सेलमध्ये ऑनलाइन तक्रार देखील दाखल केली. शेतकऱ्याकडे फक्त 8 एकर जमीन आहे. दुसरीकडे, कॅनरा बँकेचे व्यवस्थापक दीपांशू यांनी या प्रकरणाबद्दल सांगितले की, खात्यात एवढी मोठी रक्कम येणे शक्य नाही. ही तांत्रिक चूक असू शकते. एअरटेल पेमेंट बँकेकडेही कोणाच्याही खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत.
शेतकरी अजित कुमार अल्पावधीतच अब्जाधीश झाला आणि त्याच्या खात्यात अनेक ट्रिलियन रुपये येऊ लागले. तथापि, हे केवळ एका तांत्रिक त्रुटीमुळे घडले, ज्याबद्दल त्यांनी ताबडतोब पोलिस आणि सायबर सेलकडे तक्रार केली. अजित कुमार यांची यापूर्वी 1800 रुपयांची फसवणूक झाली होती. त्यांच्या खात्यातून 1800 रुपये कापले गेले होते. त्यामुळे त्यांना आधीच भीती होती की त्यांची पुन्हा फसवणूक होऊ शकते. त्यांच्याकडे तेवढी जमीनही नाही. त्यामुळे अचानक त्यांच्या खात्यात इतके पैसे पाहून अजित कुमार यांना धक्का बसला आणि त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. यासोबतच त्यांनी सायबर सेलकडे ऑनलाइन तक्रार देखील केली आणि समस्या दूर होईपर्यंत त्यांचे खाते वारंवार तपासत राहिले.
असाच प्रकार दीपक कुमार याच्यासह घडला आहे. आईच्या बँक खात्यात अचानक 1 अब्ज 13 लाख 56 हजार कोटी रुपये जमा झाले. दीपक याची आई मृत झाली असून तिचे बँक अकाऊंट सध्या दीपक वापर आहे.
