घरातून निघाला, रेल्वे ट्रॅकवर आला; लोको पायलटला संशय, पण सगळं संपलेलं; बुलढाण्यात हळहळ

सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात माणूस आयुष्य जगायचंचं विसरला की काय? असंच चित्र निर्माण झालं आहे. देशभरासह महाराष्ट्रातही अनेक तरुण-तरुणींनी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवल्याच्या घटना समोर येत आहेत. तरुणांकडून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं जातं हे न उलगडणारे कोडंच आहे. अशीच एक घटना बुलढाण्यातील नांदुरा येथे घडली आहे. एका तरुणाने आत्महत्या करत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे.

श्रीराम बुरुकले, वय – २७, असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. वयाच्या २७व्या वर्षी या तरुणाने मालगाडीसमोर येत आत्महत्या केली. ६ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास नवीन बसस्थानकाच्या मागे लोहमार्गावर मालधक्क्याजवळ हा प्रकार घडला. तरुणाने मालगाडीसमोर उडी घेतल्यानंतर मालगाडीच्या लोकोपायलटने सदर घटनेची माहिती तातडीने रेल्वेस्थानकाच्या अधिकाऱ्यांना दिली आणि घडला प्रकार समोर आला.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास नांदुरा रेल्वेस्थानकापासून हाकेच्या अंतरावर मालधक्क्याचं काम सुरू आहे. इथे ६ ऑगस्टच्या रात्री आठच्या सुमारास एक तरुण आत्महत्या करण्यासाठी लोहमार्गावर उभा असल्याचं त्या लाईनवरुन जाणाऱ्या मालगाडीच्या लोकोपायलटला दिसलं.

मालगाडी नांदुरा रेल्वे स्थानकावरुन निघाल्याने गाडीचा वेग अतिशय होता. पण तरुण गाडी खाली आल्याने गाडीच्या धक्क्याने तो लोहमार्गाच्या बाहेर फेकला गेला आणि त्यात त्याच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मालगाडीच्या लोकोपायलटने रेल्वे स्थानकावरील अधिकाऱ्यांना दिली आणि त्यानंतर त्यांनी रेल्वे पोलीसांना या घटनेची माहिती दिली. रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नंतर मृत तरुण मंगेश श्रीराम बुरुकले रा. अंबादेवी गडाच्या मागे राहत असल्याची माहिती मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *