भारतासाठी महासत्ता भिडणार? ट्रम्प यांच्या 50 टक्के Tariff नंतर मोदी सरकारचं धाडसी पाऊल; डोवाल यांनी केली घोषणा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन लवकरच भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिली आहे. 2025 च्या अखेरीस पुतिन भारतात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने दंड म्हणून भारतावर एकूण 50 टक्के आयातशुल्क आकारलं आहे. यादरम्यान पुतिन यांचा भारत दौरा याकडे धाडसी पाऊल म्हणून पाहिलं जात आहे.

“रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भारत दौऱ्यासाठी आम्ही फार उत्साही आहोत. आम्हाला वाटतं तारखा जवळपास निश्चित झाल्या आहेत,” असं अजित डोवाल यांनी सांगितलं आहे. पुढे ते म्हणाले, “तुम्ही अगदी बरोबर सांगितलं आहे की, आमचे एक अतिशय खास नाते आहे, दीर्घ संबंध आहेत आणि आम्ही आमच्या धोरणात्मक भागीदारीला खूप महत्त्व देतो. आमचे उच्च-स्तरीय संबंध राहिले आहेत आणि या उच्च-स्तरीय संबंधांनी खूप मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रपती पुतिन यांच्या भारत भेटीबद्दल जाणून घेतल्याने आम्हाला खूप उत्साही आणि आनंदी आहोत. मला वाटतं की तारखा आता जवळजवळ निश्चित झाल्या आहेत”.

याआधी रशियाने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करताना भारताला आपला व्यापारी सहकारी निवडण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. “सार्वभौमत्विक देशांना त्यांचे स्वतःचे व्यापारी भागीदार निवडण्याचा अधिकार आहे,” असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले. त्यांनी रशियासोबत “देशांना व्यापारी संबंध तोडण्यास भाग पाडण्याच्या” आवाहनांना “बेकायदेशीर” म्हणत टीका केली.

भारत रशियाकडून तेल खरेदी करून एका अर्थी युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धाला मदत करत असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी 24 तासांत भारतावर भरमसाठ आयातशुल्क लादण्याची धमकी ट्रम्प यांनी मंगळवारी दिली होती. त्यांनी ही धमकी खरी करुन दाखवत अतिरिक्त कराच्या आदेशावर स्वाक्षरी केली. त्यानुसार सवलत दिलेल्या काही वस्तू व सेवा वगळता भारतीय मालावर 50  टक्के शुल्क लादले जाणार आहे.

नरेंद्र मोदी चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार

नरेंद्र मोदी हे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी चीन दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. यावेळी ते चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना भेटण्याचा अंदाज आहे. यावेळी उभय नेत्यांमध्ये ‘ट्रम्प टेरिफ’ आणि त्यामुळे बदलत असलेल्या भूराजकीय संबंधांवर चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *