पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पतीचाही मृत्यू

पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पतीचा देखील मृत्यू झाल्याची घटना घडली. ही धक्कादायक घटना सांगलीच्या खानापूरमधील आळसंदमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार 2 ऑगस्ट रोजी सुनिता जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. रिवाजानुसार मंगळवारी ऐवजी बुधवारी त्यांचे रक्षा विसर्जन करण्यात येणार होते. परंतु त्याच दिवशी पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पती धनाजी जाधव यांना देखील हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पत्नी पाठोपाठ पतीचा देखील मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे मात्र आळसंद गावात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *