1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर अबू सालेमला माफी देत कारागृहातून लवकर सुटकेच्या मागणीला राज्य सरकारनं विरोध केला आहे. न्यायालयाकडून विचारणा करण्यात आल्यानंतर नाशिक कारागृह अधीक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात केलं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. सालेम माफीचा हक्कदार नसून त्याला किमान 25 वर्ष कारागृहात काढणे बंधनकारक असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. राज्य सरकारने 14 जुलै 2025 रोजी काढलेल्या आदेशाचा प्रतिज्ञापत्रात हवाला देण्यात आला आहे. माफीचा कालावधी तसेच पोर्तुगालमधील 3 वर्षांचा कारावास पकडून 31 मार्च 2025 मध्येच 25 वर्ष कारावासाची शिक्षा पूर्ण झाल्याचा सालेमच्या वकिलांचा दावा आहे.उर्वरित शिक्षेतून माफी देत मुदतपूर्व सुटकेसाठी सालेमने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.