मुंबईकरांसाठी मोठी बातमी! आजपासून हार्बरवर 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक, कसं असेल नियोजन? पाहा Timetable

हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (इलेक्ट्रॉनिक सिग्नल नियंत्रण प्रणाली) सुरू करण्यासाठी, मध्य रेल्वेने आज, बुधवार ६ ऑगस्टपासून ८ ऑगस्टपर्यंत रोज रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. अप आणि डाउन मार्गावर रात्री १०.४५ ते पहाटे ०३.४५ वाजेपर्यंत ब्लॉकवेळेत सिग्नल संबंधित तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे रात्री उशिरा धावणाऱ्या काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

अंशत: रद्द राहणाऱ्या लोकल (६ ते ८ ऑगस्टपर्यंत)
रात्री ८.५४ बेलापूर-सीएसएमटी लोकल वाशी स्थानकात रद्द करण्यात येईल.
रात्री ९.१६ बेलापूर-सीएसएमटी लोकल वडाळा स्थानकात रद्द.
रात्री १०.०० वांद्रे-सीएसएमटी लोकल वडाळा स्थानकात रद्द.
रात्री १०.५० व ११.३२ पनवेल-वाशी लोकल नेरूळ स्थानकात रद्द.

७ व ८ ऑगस्टला लोकल वेळेत होणारे बदल
पहाटे ५.१० ची सीएसएमटी-गोरेगाव लोकल सीएसएमटीऐवजी वडाळा रोड येथून सुटेल.

६ ते ८ ऑगस्टदरम्यान रद्द असलेल्या लोकल
सीएसएमटी – वाशी – रात्री ९.५०, १०.१४, १०.३०
वाशी-सीएसएमटी – पहाटे ०४.०३ आणि ०४.२५

वेलंकणी उत्सवासाठी चार विशेष रेल्वे
दक्षिणेतील वेलंकणी उत्सवासाठी पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते वेलंकणीदरम्यान २७ऑगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत चार विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे. गाडी क्र. ०९०९३/४ वांद्रे टर्मिनस ते वेलंकणी ही वांद्रेहून रात्री ८.४० वा. रवाना होईल. (२७ ऑगस्ट, ६ सप्टें.) (०९०९४) वेलंकणी टर्मिनसहून मध्यरात्रीनंतर १२.३० वाजता सुरू होईल. त्यांचे आरक्षण सुरू झाले आहे.

मेट्रोकामाची सळई तरुणाच्या डोक्यात घुसली
मेट्रो-५ मार्गिकेच्या कामाच्या ठिकाणी लोखंडी सळई वरून रिक्षावर पडून प्रवाशाच्या डोक्यात घुसल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी भिवंडीत घडली. या घटनेमध्ये हा तरुण प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिासंनी दिली. या घटनेला जबाबदार धरत संबंधित कंत्राटदाराला ५० लाखांचा, तर सल्लागाराला पाच लाखांचा दंड ठोठावला असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *