अल्पवयीन मुलीच्या अपहरणाप्रकरणी ताब्यात घेतलेल्या तिघा तरुणांना अमानुष मारहाण करत त्यांना एकमेकांशी लैंगिक चाळे करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकास तडकाफडकी निलंबित करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला. सज्जनसिंह नार्हेडा असे निलंबित उपनिरीक्षकाचे नाव आहे.
काय आहे प्रकरण?
जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाने केलेला अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या तीन तरुणांना अमानुष मारहाण करून एकमेकांशी लैंगिक चाळे करण्यास या उपनिरीक्षकाने भाग पाडल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलीस संबधित पोलिस उपनिरीक्षक सज्जनसिंह नार्हेडा यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
