डान्स क्लास लावायचाय, आई-वडिलांचा नकार; लेकीने थेट हार्पिक प्यायलं, नाशकात अल्पवयीन मुलीचा मृत्यू

ई-वडिलांनी डान्स क्लास लावून न दिल्याने रागाच्या भरात एका अल्पवयीन मुलीने विषारी औषध (हार्पिक) पिऊन आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या म्हसरूळ परिसरात ही घटना घडली आहे. तिला डान्सचा क्लास लावायचा होता, त्यासाठी ती आई-वडिलांकडे हट्ट करत होती. मात्र, तसं न झाल्याने तिला खूप राग आला आणि तिने रागाच्या भरात हार्पिक प्यायले. 27 एप्रिलला ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर तिला तातडीने मुंबईच्या के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. फक्त डान्स क्लास लावून दिला नाही म्हणून आपली मुलगी असं काही करेल, अशी कल्पनाही तिच्या पालकांनी कधी केली नसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *