गेल्या काही दिवसांपासून मराठी-हिंदी भाषा वादाचा मुद्दा चर्चेत आहे. असं असतानाच कल्याणमध्ये एक खळबळनजक घटना घडली आहे. कल्याणमधील परप्रांतीय तरुणाने दादागिरी करत मराठी तरुणीला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या तरुणाविरोधात मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित तरुणी ही खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम पाहते. 21 जुलै रोजी रुग्णालयात गोपाल झा नावाचा परप्रांतीय तरुण आला. तेव्हा त्यांने डॉक्टरांची भेट घ्यायची असल्याचे सांगितले. तेव्हा पीडित तरुणीने डॉक्टरांकडे एमआर बसले आहेत तुम्ही जरा थांबा, असं सांगितले. या क्षुल्लक गोष्टीवरुन परप्रांतीय तरुणाने तिला मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.
