हेडफोनचा नाद जीवावर बेतला; अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरील हृदयद्रावक घटना! वाचवायला गेलेलाही ठार

स्मार्टफोनचा सततचा वापर यामुळं तरुणाईला पुरतं वेडं करुन सोडलं आहे. हल्ली स्मार्टफोनबरोबरच हेडफोनचा वापरदेखील वाढला आहे. अनेकदा युवा पिढी काम करताना, प्रवासातदेखील हेडफोन घालून असतात. मात्र कानात हेडफोन घालून प्रवास करणे एका तरुणीच्या जीवावर बेतले आहे. कानात हेडफोन घालून रूळ ओलांडणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, महिलेला वाचवायला गेलेल्या तरुणानेही जीव गमावला आहे. अंबरनाथच्या मोरीवली गावाजवळ ही घटना घडली आहे.

अंबरनाथच्या मोरीवली गावात राहणाऱ्या 45 वर्षीय वैशाली सुनील धोत्रे आणि महालक्ष्मी नगरमध्ये राहणारा 29 वर्षीय आतिष रमेश आंबेकर हे दोघे अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत एकाच कंपनीत कामाला होते. रविवारी 20 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजता ते कंपनीतून घरी जाण्यासाठी निघालेयावेळी आतिष हा वैशाली यांना सोडण्यासाठी बी केबीन रोडवरील मोरीवली गावाजवळ गेला.

तिथून वैशाली या कानात हेडफोन घालून फोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत असतानाच रेल्वे आली, यावेळी आतिष आणि अन्य काही लोकांनी वैशाली यांना आवाज दिलापण त्यांचं लक्ष नव्हतं. तेव्हा आतिष हा वैशाली यांना वाचवायला गेलाअन तिथेच घात झाला. या दोघांनाही रेल्वेनं उडवलं, यात या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. आतिष याच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्नं झालेली असून तो त्याच्या वृद्ध आईवडिलांचा एकमेव आधार होतात्याच्या अशा अकाली मृत्यूनं आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वैशाली यांच्या पश्चात्त यांना एक मुलगी आणि २२ वर्षाचा मुलगा असून त्यांचे पती रिक्षाचालक आहेत. यंदा मुलीचं लग्न करण्याची तयारी त्यांचं कुटुंब करत होतं. अशातच त्यांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबाचा आधार हरपला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर मोरीवली गाव ते बी केबीन रोड असा पादचारी पूल उभारण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे. मोरीवली गावचे माजी नगरसेवक नंदकुमार भागवत यांनी या पादचारी पुलासह बाजूला उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी अनेकदा केली आहे. मात्र रेल्वे प्रशासन आणखी किती बळी गेल्यावर याकडे लक्ष देणार? असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *