मित्राच्या बायकोचा नाद, कोल्हापूर NCP नेत्याच्या मर्डरचं गूढ उलगडलं, महिलेसह पाच जणांना अटक

हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते लखन आण्णाप्पा बेनाडे (वय 36) यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू करताना या गुन्ह्याचा पर्दाफाश केला. बेनाडे यांचा मित्र विशाल घस्ते, त्याची पत्नी लक्ष्मी तसेच आणखी तीन साथीदारांनी अपहरण करून खून करत मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे.

नेमकं काय घडलं ?

कोल्हापूरमधील लखन बेनाडेचा मित्र असेलल्या विशाल घस्ते याला दोन वर्षांपूर्वी एका गुन्ह्यात अटक झाली होती. त्या काळात त्याची पत्नी लक्ष्मी हिने बचत गटाच्या कर्जासाठी लखन बेनाडे यांची मदत मागितली. यावेळी लखनने तिचा गैरफायदा घेतला आणि शारीरिक संबंध ठेवल्याचे आरोप पुढे आलं आहे. आरोपानुसार, लखन तिचे व्हिडिओ तयार करून मानसिक त्रास देत धमकावत राहिला. त्यानंतर काही काळ लक्ष्मी ही लखनसोबत राहू लागली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *