वांद्र्यात गॅस सिलिंडरचा स्फोट: दुमजली घर कोसळले, १५ जण जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर

वांद्रे पूर्वेतील भारतनगरमधील एका चाळीतील दुमजली घर शुक्रवारी पहाटे कोसळले. यामध्ये १५ जण जखमी झाले. त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत. गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे ही घटना घडली. अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशमन दल आणि एच पूर्व वॉर्डकडून नियुक्त कामगारांना अनंत अडचणी आल्या. तरीही यातून बचावकार्य करण्यात आले.

वांद्रे पूर्वेतील भारत नगरमधील अंजुमन नमाज कमिटी येथील चाळ क्रमांक ३७ येथे एका अरुंद गल्लीत दुमजली बांधकाम आहे. हे बांधकाम शुक्रवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास कोसळले. दुसऱ्या मजल्यावर एका सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर बांधकाम अचानक कोसळू लागले. यावेळी इमारतीत १५ जण होते. यातील तळमजल्यावरील काही जणांनी पळ काढला. मात्र बांधकाम कोसळत असल्याने त्यांना काही प्रमाणात इजा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *