शौचाला बसलेल्या व्यक्तीचा 18 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू, मुंबईतील हादरवणारी घटना

मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुलाब झालेल्या एका 52 वर्षीय व्यक्तीचा शौचाला जाताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा व्यक्ती 18 व्या मजल्यावरुन खाली पडला त्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

वडाळ्याच्या जय शिवाजी नगर येथे मातोश्री सदन ही 18 मजल्याची इमारत आहे. रविवारी सकाळी 9 च्या सुमारास या इमारतीतील 18 व्या मजल्यावरुन पडून प्रकाश शिंदे यांचा मृत्यू झाला. ते त्यांच्या एका नातेवाईकाकडे राहण्यासाठी आले होते. 52 वर्षांच्या व्यक्तीचे पोट खराब झाले होतं. त्यांना अतिसाराचा त्रास होत होता. रविवारी त्यांचा हा त्रास वाढला होता. त्याच्या घरात एकच शौचालय होते. ते शौचालय आधीच वापरात होते. त्यामुळं ते घाईघाईत घराबाहेर गेले आणि शौचास बसण्यासाठी जागा शोधू लागले. इमारतीच्या लिफ्टजवळ असलेल्या उघड्या डक्टजवळ ते शौचास बसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *