ससून डॉकच्या समुद्रात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ समोर, 4 वर्षांच्या चिमुकलीला तिच्याच…

अॅटॉप हिलमधून बेपत्ता झालेल्या चार वर्षाच्या चिमुरडीचा मंगळवारी सकाळी ससून डॉक येथील समुद्रात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहेसावत्र वडिलांनीच मुलीची हत्या करून तिला समुद्रात फेकल्याचा संशय असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. अमायरा असे मृत मुलीचे नाव असून ती आई नाझियासोबत अॅटॉप हिलच्या राजीव गांधीनगरातील बंगालीपुरा येथे राहण्यास होतीदोन वेळा लग्न मोडल्यानंतर नाझियाने नुकतेच इम्रान ऊर्फ इम्मू या तरुणाशी लग्न केले होते.

सोमवारी रात्री उशिरापर्यंत अमायरा घरी न परतल्याने तिचा शोध सुरू केलाअखेर तिचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने आईने सोमवारी रात्री अँटॉप हिल पोलिसांत तक्रार दिलीअमायराचा शोध सुरू असतानामंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ससून डॉकजवळील समुद्रात मासेमारी करणाऱ्या गोपी धनू नावाच्या मच्छीमाराला अमायराचा मृतदेह आढळलात्याने मृतदेहबाहेर काढून कुलाबा पोलिसांना याबाबत कळविलेपोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केलापोलिसांनी अमायराच्या सावत्र वडिलांना ताब्यात घेतलं आहे.

अमायरा लवकर झोपत नव्हतीशिवाय सतत मोबाइल मागत होतीत्याच रागातून हत्या केल्याची माहिती समोर येत आहेपोलिसांनी इम्रानला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोमवारी रात्री सावत्र वडील इम्रानसोबत अमीराला बघितले होतेअमायरा हरवल्याची तक्रार दिल्यानंतर तोही बेपत्ता झालात्याचा फोनही बंद लगत असल्याने त्याच्यावरचा संशय आणखी बळावला आहेयाप्रकरणी पोलिसांनी इम्रानला ताब्यात घेतले असूनतांत्रिक माहितीबरोबरच परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेतइम्राननेच अमायराची हत्या करून तिला समुद्रात फेकल्याचा संशय पोलिसांना आहेगुन्हे शाखाही याचा समांतर तपास करत आहे.

दरन्यानसुरुवातीला पोलिसांनी मृतदेह शवचिकित्सेसाठी जेजे रुग्णालयात पाठविला होतायाप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत ओळख पटविण्यासाठी या चिमुकलीच्या मृतदेहाची छायाचित्रे मुंबईसह विविध पोलिस ठाण्यांना पाठवून तपास सुरू केलामंगळवारी सकाळी अॅटॉप हिल पोलिसांना याबाबत माहिती मिळताच अमायराचा शोध थांबलाया घटनेने तिच्या आईला धक्का बसला आहेतिचा मृत्यू नेमका कसा झालायाचा शोध पोलिस घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *