कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी; एसटी बसबाबत मंत्री सरनाईकांची मोठी घोषणा

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. कारण एसटी महामंडळ यंदा गणेशोत्सवासाठी 5000 जादा बसेस सोडणार आहे. 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या काळात या बसेस धावणार आहेत. 22 जुलैपासून गट आरक्षणाला सुरुवात होणार आहे असून महिला व ज्येष्ठांना तिकीट दरात सवलत मिळणार आहे. याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली.

“गणपती उत्सव कोकणातील लोकांचा महत्त्वाचा सण मानला जातो. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या -तोट्याचा विचार न करता एसटी महामंडळ दरवर्षी जादा बसेस सोडते. यंदाही सुमारे 5000 जादा गाड्या कोकणात जाणार आहेत,” असे मंत्री सरनाईक म्हणाले.

या बसेसचे आरक्षण npublic.msrtcors.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच, बसस्थानकावर किंवा MSRTC Bus Reservation ॲपवरही आरक्षण करता येणार आहे. आषाढी एकादशीला एसटी महामंडळाने 5200 जादा बसेस सोडल्या होत्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *