समलिंगी व्हिडिओवरुन ब्लॅकमेल, मुंबईत 32 वर्षीय सीएने आयुष्य संपवलं

32 वर्षीय सीए राज मोरे याच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी राहुल परवानी आणि सबा कुरेशी या दोघांना अटक केली आहे. राहुल मॉडेलिंग करतो, तर सबा त्याची सहकारी आहे. या दोघांनी मिळून राजला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून 2.47 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. राज आणि राहुल यांच्या समलिंगी संबंधांचे व्हिडिओ दाखवून राहुल-सबा जोडगोळी त्याला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप आहे. या तणावातून राजने आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. राजने आत्महत्येपूर्वी आईला एक भावनिक चिठ्ठी लिहिली होती, यात त्याने राहुल आणि सबा या दोघांचा उल्लेख केला होता.

राज मोरे याने मुंबईतील सांताक्रूझ (पूर्व) येथील राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी 26 वर्षीय राहुल परवानी आणि त्याची 22 वर्षीय सबा कुरेशी यांना अटक केली आहे. राजने आत्महत्येपूर्वी पोलिसात तीन तक्रारी दाखल केल्या होत्या. राजने काही काळापूर्वीच कर्करोगावर मात केली होती. तो सीएची परीक्षाही पास झाला होता. पण आयुष्यातील अडचणींना तो तोंड देऊ शकला नाही. त्याच्या पश्चात त्याची आजारी आई आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *