झासीच्या टहरौली परिसरात 22 जून रोजी 55 वर्षांच्या सुशीला राजपूत यांची हत्या करण्यात आली होती. सुशीला यांच्या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. अखेर या हत्येचे गूढ समोर आले आहे. ज्या महिलेला कुटुंबाने प्रेम आणि दया दाखवत स्वीकारले तिनेच कुटुंबातील मुख्य व्यक्तीची हत्या केली. या हत्येमागे घरातील सूनेचाच हात असल्याचे उघड झाले आहे. सुंदर चेहरा आणि चाणाक्ष नजर असलेली पूजा जाटव याआधी देखील तुरुंगात जावून आली होती.
पूजावर आरोप आहेत की, पहिल्या पतीसोबत वाद झाल्यानंतर त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यानंतर तिला शिक्षा म्हणून तुरुंगात जावे लागले. तिचा पहिला पती रेल्वेत कार्यरत होता. जेलमधून सुटल्यानंतर पुन्हा तिची भेट कल्याण राजपूतसोबत झाली. दोघंही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. साधारण सहा- सात महिने एकत्र राहिल्यानंतर एका रस्ते अपघातात कल्याणचा मृत्यू झाला. त्यानंतर पूजा त्याच्या गावी पोहोचली. पूजाने रडत रडत कल्याणच्या अपघाताची माहिती दिली. तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी तिचा स्वीकार केला आणि हिच सगळ्यात मोठी चूक ठरली. त्यांनी तिला सून मानून घरात राहायला जागा दिली तसंच, तिच्या पुढच्या शिक्षणाचीदेखील सोय केली. मात्र या दरम्यान कल्याणचा मोठा भाऊ संतोषसोबत तिचे संबंध जुळले. संतोष आधीपासूनच लग्न झाले होते. या नात्यातून त्यांना एक मुलगीदेखील झाली.
पूजा आणि संतोष याच्या नात्यामुळं घरात तणाव निर्माण झाला. संतोषची पत्नी रागिणी माहेरी निघून गेली. रागिणीच्या म्हणण्यांनुसार पूजाच्या कटकारस्थानांचा आम्हाला कधीच अंदाज आला नाही. पूजा आमच्या घरात 6 वर्षांपर्यंत राहिली होती पण कधीच तिच्यावर संशय आला नाही. 22 जून रोजी पूजाने तिचे सासरे आणि संतोष दोघांना ग्वालियरला बोलवून घेतले. त्याच दिवशी तिची बहिणी कामिनी आणि प्रियकर गावच्या घरी गेले. त्यानंतर तिघांनी मिळून संतोषची आई सुशीलाला चहा दिला नंतर नशेचे इंजेक्शन देऊन निर्घृणपणे तिची हत्या केली. घरातील 8 लाख आणि दागिने घेऊन तिघेही फरार झाले.
या घटनेचा पहिला संशय सून रागिणीवर होता. मात्र सीसीटिव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सने हळूहळून संशय पुजावर आला आणि पुजाच मास्टरमाइंड असल्याचे उघड झाले. हत्येनंतर पूजाने दुसऱ्या सीमवरुन घरी फोनदेखील केला होता. जेणेकरून ती निर्दोष असल्याचे सिद्ध होईल.
