दिशा सालियनची हत्या की आत्महत्या? महाराष्ट्र शासनानं कोर्टात काय सांगितलं?

 दिशा सालियन हिची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही अशी माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात दिली. दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेत शिवसेना UBT चे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या याचिकेवर पोलिसांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की दिशा सालियनच्या मृत्यूमध्ये संशयाला जागा नाही. तिच्या वडिलांनी सीबीआय चौकशीच्या याचिकेला विरोध केला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचाराचे कोणतेही लक्षण आढळले नाहीत आणि मित्रांच्या जबाबावरून असे दिसून आले की दिशा सालियन मद्यधुंद आणि तणावाखाली होती.

आदित्य ठाकरेंनी काय केली होती मागणी? 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक असणारी दिशा सालियन हिच्या आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या देखील नावाचा उल्लेख आहे. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी दिशाचे वडिल सतीश सालियन यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरे यांच्यासह इतर काही जणांविरुद्ध एफआयआर दाखल करावा अशी याचिका न्यायालयात केली होती. याबाबत आदित्या ठाकरे यांनी त्यांची अनावश्यक बदनामी केली जात असल्याचं म्हटलं आहे.

दिशा सालियन प्रकरणी एक विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. या प्रकरणाची प्रामाणिकपणे चौकशी सुरु असल्याचा युक्तिवाद आदित्य ठाकरे यांनी न्यायालयात केला आहे. अशातच एफआयआर दाखल करणे योग्य नाही. त्यांच्याविरुद्ध लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. त्यांना बदनाम करण्यासाठी या प्रकरणात ओढलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पोस्टमार्टम अहवालात काय? 

वैज्ञानिक तपासणी आणि पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. यामध्ये लैंगिक किंवा शारीरिक अत्याचाराचे कोणतेही चिन्ह किंवा पुरावे आढळले नाहीत. तपासणीत वीर्य किंवा योनीमार्गावर कोणतेही जखमा आढळल्या नाहीत. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी केलेले आरोप निराधार असल्याचे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले.

दिशाच्या मैत्रिणींनी सांगितले की, तिच्या कुटुंबाशी वाद झाल्यामुळे आणि तिचा व्यवसाय करार पूर्ण न झाल्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. मृत्यूच्या आधी ती खूप मद्यधुंद होती. या परिस्थितीत दिशाने स्वत:च्या इच्छेने खिडकीतून उडी मारली आणि आत्महत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *