शेवटच्या चिठ्ठीत पोलीस शिपाई शिंदेंचं नाव, नालासोपाऱ्यात बिल्डरने जीव दिला, 32 लाख देऊनही…

पोलिसांच्या जाचाला कंटाळून एका बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईजवळच्या नालासोपारा परिसरात घडली आहे. जयप्रकाश चौहान असे आत्महत्या केलेल्या बिल्डरचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याचे नाव लिहित तो आपल्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचेही बिल्डरने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.

पेशाने बांधकाम व्यवसायिक असलेले जयप्रकाश चौहान (वय 64) हे नालासोपारा येथे वास्तव्यास होते. जयप्रकाश चौहान यांनी मंगळवारी राहत्या घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

मागील काही महिन्यांपासून ते अत्यंत तणावाखाली असल्याचे कळते. पोलिसांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे चौहान यांनी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बांधकाम व्यवसायिक जयप्रकाश चौहान यांनी नालासोपारा संयुक्तनगर येथे ओम श्री दर्शन ही इमारत पुनर्विकास बांधकामासाठी घेतली होती. या बांधकामासाठी पोलीस शिपाई श्याम शिंदे याने त्याच्या नातलगाच्या माध्यमातून 50 लाखांची गुंतवणूक, दुप्पट पैसे आणि चार फ्लॅटचा ताबा जामीन अशाप्रकारे केली.

इमारत पुनर्विकास बांधकामास एक वर्षाहून अधिक काळ लोटल्याने पोलीस शिपाई श्याम शिंदे आणि त्याचा सहकारी राजेश महाजन तसेच आणखी एक इसम लाला लजपत यांनी बांधकाम व्यवसायिक जयप्रकाश चौहान यांच्याकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला.

त्यानंतर चौहान यांनी 22 लाख ऑनलाईन आणि 10 लाख रोख असे 32 लाख रुपये श्याम शिंदेला दिल्याचे त्यांचे नातेवाईक आणि मित्रांचे म्हणणे आहे. मात्र तरीही श्याम शिंदे आणि त्याचा सहकारी जयप्रकाश महाजन हे दोघे चव्हाण यांचा छळ करत असल्याचा आरोप चौहान यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *